Stall layout

 Chikoo Festival 2018 Stall Layout … for bookings

contact : +91 91303 23550 , +91 83907 95749 & +91 98237 07096

चिकू फेस्टिवल २०१८ ची स्टॉल बुकिंग आज दिनांक १५/१२/२०१७ रोजी सुरू होत आहे तरी इच्छुकांनी लवकरात लवकर चिकू फेस्टिव्हल कार्यालय अमृतवाडी – बोर्डी येथे सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत प्रत्यक्ष येउन आपल्या पसंतीचा स्टॉल त्यासाठीच्या योगदानाची रक्कम रोख, चेक किव्हा ऑनलाइन ट्रान्सफरने देऊन बुक करावा ही विनंती .सोबत ह्या वर्षीचा लेआऊट पाठवत आहे. त्यांतील स्टॉल न- ३६ ते ५० ( लाल रंगाने दाखवलेले) स्टॉल नॉनव्हेज फूडस्टॉल असतील , स्टॉल न- १०६ ते १२१ ( हिरव्या रंगाने दाखवलेले) स्टॉल व्हेज फूडस्टॉल असतील , स्टॉल न- १२२ ते १३५ ( पिवळ्या रंगाने दाखवलेले) स्टॉल प्रीमियम स्टॉल असतील, इतर सर्व स्टॉल्स जनरल स्टॉल आहेत. एक व्यक्तीस जास्तीत जास्त दोनच स्टॉल बुक करता येईल ह्याची कृपया नोंद घ्यावी.

*स्टॉल धारकांसाठी नियमावली*
१) दिनांक २७ आणि २८ जानेवारी रोजी वाहन /टेम्पो यांना सकाळी 9 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 8 वाजल्यानंतरच् मैदानात प्रवेश राहील.
२) स्टॉल १०×१०×१० फूट असेल. त्यात २ खुर्च्या व २ टेबले आणि १ लाइट असेल.
३) स्टॉलमध्ये वाढीव मंडपाचे काही सामान हवे असल्यास तसे किमान १ आठवडा आधी सांगावे आयत्या वेळेवर वस्तू पुरवणे शक्य होणार नाही.
४) कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिक व थर्माकोलचा वापर करू नये. अन्यथा दंड आकारण्यात येईल. स्टॉलधारकानी प्लास्टिकसाठी पर्यायी व्यवस्था करावी
५) खाद्य पदार्थाच्या स्टॉल्सच्या समोरील बाजूस घेतलेले पदार्थ बसून खाता यावेत म्हणून मैदानात टेबल्स आणि खुर्च्यांची व्यवस्था केली आहे. परंतु त्यांच्या साफसफाईची व्यवस्था स्टॉलधारकांनीच् करावयाची आहे .
६) चिकू फेस्टिव्हलमध्ये सर्व ठिकाणी कचरपेटीची व्यवस्था केली आहे तरीही ज्या स्टॉलवर कचरा होणाऱ्या वस्तूची विक्री होणार असेल त्यांनी स्वतःची कचरापेटी आणून स्टॉलच्या बाहेर ठेवावी आणि त्यामुळे स्टॉल कींवा फेस्टिव्हलच्या आरोग्य व सुशोभिकारणात कुठलीही बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.
७) खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या पदार्थांची सूचि त्यांच्या किंमती व प्रमाणांसहा लिहून सहज दिसेल अश्या प्रकारे प्रदर्शित करणे बंधनकारक राहील व ती दर व प्रमाणसूचि २ दिवस समान राहील ह्याची दक्षता घ्यावी.
८) स्टॉलवर खाद्यपदार्थ शिजवताना घ्यावयाची दक्षता व अग्निप्रतिबंधक उपाययोजना याची जवाबदारी स्टॉलधारकांचीच् राहील
९) संपुर्ण फेस्टीव्हल काळात स्टॉलधारकांच्या सामानाची व त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेची जबाबदारी स्टॉलधारकांचीच राहील. चिकू फेस्टिव्हल समिती कुठल्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही.
१०) पहिल्या दिवशी रात्री स्टॉल धारकांना त्यांचे सामान ठेवण्यासाठी हॉल उपलब्ध करून देण्यात येईल. तेथे स्टॉलधारक त्यांचे सामान स्वतःच्या जबाबदारीवर ठेऊ शकतील.
*महत्वाची सूचना* :— चिकू फेस्टीव्हलमध्ये बनविलेले / विक्री केले जाणारे खाद्यपदार्थ-पेये अन्न व औषध प्रशासन आणि वैध मापन प्रशासनाच्या नियमावलीनुसार असण्याची जवाबदारी स्टॉलधारकांचीच् असेल याची सक्त नोंद घ्यावी